शेतकरी संघटनेचे नेते शंकर गोडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला

February 5, 2011 2:09 PM0 commentsViews: 7

05 फेब्रुवारी

शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे यांच्यावर आज पहाटे 3 च्या सुमारास 6 अज्ञात लोकांनी गाडी अडवून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गोडसे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुसेगावच्या संजीवनी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शंकरराव गोडसे शेतक-यांसाठी तसेच शासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र आंदोलनं करत आहेत. ऊसदरप्रश्नी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांवर मोर्चे-आंदोलनं केली आहेत. तसेच सध्या सर्वत्र भेसळ माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात गोडसे अग्रभागी होते. सध्या ऊसगाळपाचे गेल्या तीन महिने झाले तरी पहिला हप्ता शेतक-यांना मिळालेला नाही. कायद्याप्रमाणे 14 दिवसांच्या आत हा हप्ता देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. या प्रकरणी गोडसे यांनी तक्रार केली होती. त्यामुळे काही कारखान्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. याचाच राग मनात धरून काही अज्ञातांनी आपल्यावर हल्ला केल्याचे गोडसे यांचं म्हणणं आहे.

close