चित्रशैलीतून डॉ.बाबसाहेब आंबेडकरांची जीवनगाथा

April 14, 2011 3:27 PM0 commentsViews: 9

प्रियांका देसाई, मुंबई

14 एप्रिल

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा सांगणारं भिमायना नावाचं एक पुस्तक नुकतंच तयार करण्यात आलं आहे. या पुस्तकाचं वैशिष्ठ म्हणजे पारधान गोंध ही मध्य प्रदेशमधली चित्र शैली तिथल्या स्थानिक चित्रकारांनी तयार केलेली यातून बाबासाहेबांची जीवनगाथा चित्रातून साकारली आहे.

या पुस्तकात आपली नजर खिळवून ठेवतात ते चित्रांमधले मोठे मोठे डोळे आणि ही या चित्र शैलीची खासियत एका मागोमाग एक चित्रातून आंबेडकरांची गोष्ट पुढे सरकते. चित्रांतून कथा सांगितल्या गेल्या असल्या तरी हे ग्राफिक नॉव्हेल नाही. बाबासाहेबांची शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी मिळालेली वागणूक किंवा उच्चशिक्षित असूनही घरासाठी झालेली वण वण या आणि अशा काही बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या प्रसंगांबद्दल ही चित्र बोलतात. सद्या हे पुस्तक इंग्रजीत आहे आणि लवकरच पुस्तकांच्या दुकानात मिळणार आहे.

close