सीएसटी रेल्वे स्थानकावर ‘सफाई’ चोर अटक

February 5, 2011 3:17 PM0 commentsViews: 5

05 फेब्रुवारी

मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसला ट्रेनमधून येणार्‍या पार्सलमधून वस्तू चोरी करणार्‍या एका महिलेला सीएसटी रेल्वे पोलिसांनी अटक केली. सीएसटी टर्मिनलवर रोज हजारो पार्सल्स येतात. या पार्सलमध्ये असलेल्या वस्तू अनेकदा चोरीला गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या वस्तंूची चोरी दुसरं तिसरं कोणी नाही तर रेल्वे सफाई कर्मचारी करत होते. सी.सी.टि.व्ही च्या माध्यमातून ही चोरी उघडकीला आली आहे. सी.सी.टि.व्ही च्या दृष्यांमध्ये देवी अंबिका अय्यर नावाची सफाई कर्मचारी महिला रेल्वे स्थानकाच्या पार्सलमधून वस्तूची चोरी कशी करते ? ती महिला गेल्या 5 वर्षापासून रेल्वे सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती.

close