पाकिस्तानच्या 3 खेळाडूंवर बंदी

February 5, 2011 3:31 PM0 commentsViews: 6

05 फेब्रुवारी

स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या तीन पाकिस्तानी खेळाडूंवर आयसीसीने अखेर निर्णय घेतला आहे. मोहम्मद आसिफ, मोहमद आमिर आणि सलमान बट्ट या तिघांवरही बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. सलमान बट्टवर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली असून मोहम्मद आसिफवर 7 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मोहम्मद आमिरवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. शुक्रवारी ब्रिटन पोलिसांकडून या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आयसीसीच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आसिफ आणि सलमान यांच्यावर आजीवन बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण 10 आणि 7 वर्षांची बंदी मिळाल्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला असेल. तसेच मोहम्मद आमिर हा फक्त 18 वर्षांचा असल्यामुळे त्याच्यावरची बंदी कमी वर्षांची ठेवण्यात आल्याचं कळतंय. मॅच दरम्यान फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या तिघांना 17 मार्चपर्यंत हजर होण्याचा आदेशही ब्रिटन कोर्टनं बजावला. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुध्द झालेल्या टेस्ट मॅचमध्ये जाणून बुजून नो बॉल टाकल्याचा आरोप या यांच्यावर ठेवण्यात आला होता.

close