इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी लावल्या 36 तास रांगा

February 5, 2011 3:52 PM0 commentsViews: 31

05 फेब्रुवारी

मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आटापिटा करीत असतात. मात्र आता बदलापूरसारख्या छोट्या शहरातही हे लोण पसरलं आहे. आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी बदलापूर शहरात पालकांनी कार्मेल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर सुमारे 36 तास रांगा लावल्या होत्या. या शाळेचे नर्सरीसाठीचे प्रवेश अर्ज आज सकाळपासून देण्यात आल्यामुळे अर्ज घेण्यासाठी दीड ते दोन हजार पालकांनी काल म्हणजेच 4 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शाळेबाहेर रांगा लावल्या होत्या. रात्री एक ते दोन किलोमीटर पर्यंतच्या या रांगेत अंथरूण पांघरूण घेऊन कुडकुडत पालक उभे होते. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, वांगणी, नेरळपासून पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आले होते. विशेष म्हणजे कल्याण बदलापूर रस्त्याच्याकडेला लाईट-पाणीही नाही अशा अवस्थेत पालकांनी रांगा लावल्या होत्या. साडेतीनशे जागांसाठी सुमारे दीड हजार पालक रांगेत उभे होते.

close