उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांबाबत सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त

November 4, 2008 2:12 PM0 commentsViews: 2

4 नोव्हेंबर, दिल्लीमहाराष्ट्रात केवळ राजकीय इच्छाशक्ती असेल तर उत्तरभारतीयांवरील होणारे हल्ले थांबू शकतात, असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे. उत्तर भारतीयांवर होणार्‍या हल्ल्यांसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं हे मत व्यक्त केलंय. या याचिकेवरची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. गेल्या महिन्यात रेल्वेची परीक्षा देण्यासाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना मनसेनं कार्यकर्त्यांनी हल्ले केले होते. त्या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटले होते.

close