सांगलीत शिवसेनेचं जागर आंदोलन

February 5, 2011 4:26 PM0 commentsViews: 2

05 फेब्रुवारी

सांगली महानगरपालिकेतील महापौर निवडीवरून सत्ताधारी महाआघाडीत फूट पडली असून महापौरपदासाठी वादग्रस्त उमेदवार दिल्यामुळे घटक पक्ष असलेल्या भाजपा नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. तर याच मुद्द्यावरून शिवसेनेने आज अनोख आंदोलन केले. वादग्रस्त उमेदवाराला पाठिंबा देऊ नये याकरता भाजपच्या नगरसेवकाच्या घरासमोर जागर घालण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरा महानगरपालिकेत सर्वपक्षीय महाआघाडीची सत्ता आहे. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी स्थापन केलेल्या महाआघाडीत राष्ट्रवादी, भाजप, जनता पक्ष, आरपीआय, जनसुराज्य, शेकाप हे पक्ष सहभागी आहेत. येत्या 7 फेब्रुवारी होणार्‍या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी इद्रीस नायकवडी यांचा अर्ज दाखल केला आहे. तर महाआघाडीतील दुस-या गटानं सुरेश आवटी यांची उमेदवारी दाखल केली आहे. एकीकडे नायकवडी यांना राष्ट्रवादी नगरसेवकांचा विरोध असताना भाजप उमेदवारांनीही नायकवडी यांना उघडपणे विरोध केला आहे.

close