माकपचं दोन दिवसांपासून आंदोलन सुरूच

February 6, 2011 11:20 AM0 commentsViews: 5

06 फेब्रुवारी

वनाधिकार कायद्याखाली फेटाळलेल्या दाव्याचा पुनर्विचार व्हावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आंदोलन सुरु केलं आहे. नाशिक पेठ रस्त्यावर पाच हजार आदिवासी गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर बसून आहेत. हर्सूल रस्ताही या मागणीसाठी बंद करण्यात आला. करंजवाडीतलं आंदोलन तिसर्‍या दिवशीही सुरु आहे. चांदवडमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी जेलभरो आंदोलन केलं. वनाधिकार कायद्याअंतर्गत आदिवासींना कसत असलेल्या वनजमीनींचे सातबारा उतारे मिळावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. मुख्यमंत्री ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आजही धरणं आंदोलन करण्यात येत आहे.

close