कोल्हापूरमध्ये वकीलांचे असहकार आंदोलन

February 6, 2011 11:39 AM0 commentsViews: 2

06 फेब्रुवारी

पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित खटले सोडवण्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ व्हावे म्हणून सर्वपक्षीय असहकार आंदोलन करण्यात आलं. प्रलंबित खटले सोडवण्यासाठी पक्षकार आणि वकीलांना मुंबईला अनेक वर्ष चकरा माराव्या लागतात. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना मध्यवर्ती असणार्‍या कोल्हापुरात खंडपीठ व्हावे त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होऊन पक्षकारांना लवकर न्याय मिळेल असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. यासाठी कोल्हापुरासह जिल्ह्यात बहिष्कार आंदोलन केलं. यामध्ये सर्व पक्षांनी सहभाग घेतला. कोल्हापुरात लोक अदालत कामकाजाला वकीलांना गांधीगिरी पद्धतीनं असहकार पुकारला. हे आंदोलन सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या जिल्ह्यातही होत आहे.

close