बलात्काराप्रकरणी मॉन्सेरात यांचा मुलगा पोलिसांना शरण

November 4, 2008 2:15 PM0 commentsViews: 3

4 नोव्हेंबर, गोवा गोव्याचे शिक्षणमंत्री बाबूश मॉन्सेरात यांचा मुलगा रोहित अखेर गोवा पोलिसांना शरण आला आहे. एका जर्मन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप बाबूश मॉन्सेरात यांच्या मुलावर आहे. कलंगुट पोलीस ठाण्यात रोहित मोन्सेरात शरण आला. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास तीन आठवडे तो फरार होता. ' मी राजकारणात असल्याची शिक्षा माझा मुलगा भोगतोय. तो निष्पाप आहे. मला संपवण्यासाठी हा कट रचला आहे ', असं गोव्याचे शिक्षण मंत्री बाबूश मॉन्सेरात यांनी सांगितलं.

close