पुण्याच्या ‘सार्थक’ महोत्सवात सोलापूरची छाप

February 6, 2011 11:46 AM0 commentsViews: 23

06 फेब्रुवारी

पुणेकर सध्या मजा लुटताहेत 'सार्थक' महोत्सवाची. हा महोत्सव सोलापूरातील लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे पुण्यातील झेड ब्रिजवर भरविण्यात आला आहे. खवय्ये पुणेकर आणि पुण्यात स्थायीक झालेल्या सोलापूरकरांसाठी हा महोत्सव म्हणजे पर्वणीच आहे. वांग्याचं भरीत, शेंगदाण्याची चटनी आणि त्याच्यासोबत भाकरी किंवा मटन आणि लाल रस्स्यामधले खिमा उंडे या अस्सल सोलापुरी बेतावर खवय्ये मनसोक्त ताव मारत आहे. सोलापुराचं वैशिष्ट्य अधोरेखित करणार्‍या अनेक वस्तू या प्रदर्शनात आहेत. त्यामध्ये जगप्रसिद्ध सोलापुरी चादरी, सोलापुरी साडी, खण, सोलापुरी लेदरच्या अनेक वस्तू या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. अनेक प्रकारच्या वस्तुंचे सत्तर स्टॉल या प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत. अनेक नवोदित लघुउद्योजकांसाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरतोय. पुणेकरांचाही या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. 4 तारखेला सुरु झालेल्या या महोत्सवाची आज सांगता होणार आहे.

close