चिंरजीवींचा प्रजाराज्यम पक्ष काँग्रेसमध्ये विलीन

February 6, 2011 12:04 PM0 commentsViews: 7

06 फेब्रुवारी

आंध्रप्रदेशमधल्या घडामोडींनी त्रस्त झालेल्या काँग्रेसला आज मोठा दिलासा मिळाला आहे. तेलगू फिल्मस्टार चिंरजीवी यांनी आपला प्रजाराज्यम पक्ष आज काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. चिरंजीवी यांनी आज काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन नवी दिल्लीत ही घोषणा केला. राजशेखर रेड्डी यांचे पुत्र जगनमोहन यांच्या बंडानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसनं चिरंजीवी यांना पक्षात आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. अखेर या हालचालींना यश आलं आहे. दरम्यान आपण राज्य सरकारमध्ये कोणतंही मंत्रिपद स्वीकारणार नसून फक्त जनतेची कामं व्हावीत यासाठी काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचं चिरंजीवीनं सांगितलं आहे.

close