सांगलीच्या विद्यार्थ्यांनी बनवली अनोखी कार

February 6, 2011 12:37 PM0 commentsViews: 6

असिफ मुरसल, मुंबई

06 फेब्रुवारी

सध्या मल्टी टेरेन व्हेईकल्सची मार्केटमध्ये बरीच चलती आहे. पण ऑल टेरेन व्हेईकल मिळाली तर सोने पे सुहागा. पण ही ऑल टेरेन व्हेईकल म्हणजे एटीव्ही बनवणं हे प्रत्येकालाच शक्य नसतं. पण सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इजिंनियरिंगच्या विद्यार्थ्यानी ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. इंजिनिअरींग कॉलेजच्या मुलांनी रोबो किंवा गाड्या बनवणं तसं काही नवीन राहिलं नाही. पण सांगलीच्या वालचंद इजिंनियरिंग कॉलेजच्या मुलांनी अशी एक खास गाडी बनवली जी फक्त साध्या रस्त्यावरुनच नाही तर उंच चढाच्या रस्त्यावरुन, चिखलातून, खडकाळ जमिनीवरुनचं नाही तर 45 अंशाच्या कोनातूनही ताशी 75 किलोमीटरच्या वेगाने धाऊ शकते. इतकचं नाही तर हे ऑल टेरेन व्हेईकल म्हणजे ही एटीव्ही इको फ्रेंडलीसुद्धा आहे. आणि हिचं नाव आहे दी आयर्न एटीव्ही कार.

इंजिनिअरींगच्या तिसर्‍या वर्षांत शिकणार्‍या 25 विद्यार्थ्यांनी मिळून या आयर्न कारची निर्मीती केली. आणि विशेष म्हणजे हिला लागणारे बहुतेक करुन मटेरीयल या मुलांनी भंगार मधून शोधून वापरले आहे. पण असं समजू नका की या गाडीत मग काही दम नाही. एका अत्याधुनिक गाडीत जे काही लागतं ते सगलं या आयर्न एटीव्हीत आहे. या गाडीचं डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉलेजच्या वर्कशॉपमध्येचं करण्यात आलं आहे. इतकचं नाही तर या गाडीत कॅटॅलिक कन्व्हर्टर बसवल्यामुळे प्रदुषणसुद्धा नियंत्रणात ठेवलं आहे.

आता इतकं काही असल्यावर तुम्ही म्हणाल की गाडीची किंत मात्र जास्त असेल. पण थांबा, हिचा एकूण खर्च फक्त 4 लाख रुपये इतकाच आहे. आणि फक्त ही कार एक मल्टी पर्पझ व्हेईकलसुद्धा आहे. गाडी म्हणून तर तुम्ही ती वापरु शकालचं पण त्याचबरोबर जिथे ट्रॅक्टर नेता येत नाही तिथे शेतीची कामसुद्धा ही आयर्न एटीव्ही करु शकते.

close