मुंबई – गोवा हायवेवर झाडांची कत्तल सुरू

February 6, 2011 1:57 PM0 commentsViews: 88

06 फेब्रुवारी

मुंबई – गोवा हायवेवर सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली. रस्ता रुंदीकरणासाठी हाय-वे ऑथॉरिटीने सुमारे 150 किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं तोडण्याचं काम ठेकेदारीवर दिलं. मात्र ठेकेदाराने बेकायदेशीरपणे ही वृक्षतोड केली असा आरोप इथल्या सामाजिक संघटनांनी केला. कित्येक वर्षं जुने असलेले वड, पिंपळ आणि आंब्याचे वृक्ष धडाधड तोडले जात आहेत. यामुळे पर्यावरणाची होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी हाय वे विभागाने जेवढी झाडं तोडली जातील तेवढी पुन्हा नवीन झाडं लावण्याचीही जबाबदारी पार पाडावी अशी मागणी लांजा तालुक्यातल्या सामाजिक संघटनांनी केली.

close