नागपुरात महालोक अदालतच आयोजन

February 6, 2011 2:02 PM0 commentsViews: 1

06 फेब्रुवारी

देशातील न्यायालयात अनेख खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे समाजातील शेवटच्या स्तरापर्यंतच्या व्यक्तींना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी लोक अदालतची सुरूवात झाली. सामान्यांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले खटले लवकरात लवकर निकाली लागावे. या माध्यमातून आपसात असलेले तंटे सुटावे म्हणून नागपूरात आज महालोक अदालतचं आयोजन जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आलं. यात विविध प्रकारचे 65 हजार खटले दाखल करण्यात आले. यातून जवळपास 40 हजार खटले निकाली निघतील असा विश्वास वकील संघटनेकडून व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आजच नागपुरात गरीब व्यक्तींना न्याय मिळावा यासाठी काही उपाय सुचविले आहेत. त्यामुळे आजच्या या महालोक अदालतला विशेष महत्व आहे.

close