मुबारक यांचा सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा

February 6, 2011 2:11 PM0 commentsViews: 1

06 फेब्रुवारी

इजिप्तमध्ये राष्ट्राध्य होस्नी मुबारक यांनी सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. तसेच मुलालाही पदावरुन त्यांनी काढून टाकलं आहे. मात्र, मुबारक यांच्या विरोधात इजिप्तमध्ये आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनात आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुबारक विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान इजिप्तमध्ये ठप्प असलेला आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू झाला आहे. आजपासून बँका सुरु झाल्या आहेत. पण निदर्शक आणि सुरक्षा दलातला संघर्ष सुरू आहे.

close