पत्रकारांनी केला अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

February 6, 2011 2:23 PM0 commentsViews: 2

06 फेब्रुवारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांविषयी केलेल्या उद्दाम वक्तव्याचा औरंगाबादच्या पत्रकारांनी निषेध केला. नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरण जलपूजन समारंभात पत्रकारांवर आता बंदीच आणायला पाहिजे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या या आंदोलनात जिल्हा मराठी पत्रकार संघटना, मराठवाडा टेलिव्हिजन असोसिएशन, वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेना सहभागी झाले होते.औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पत्रकारांनी हे आंदोलन केलं.अजित पवारांच्या उद्दाम वक्तव्याचा निषेध करत तोंडाला काळ्या पट्टया, रूमाल बांधून निषेध नोंदवत सर्व प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले. या घटनेच्या निषेधार्थ एक निवेदनही विभागीय आयुक्तांंसह राज्याच्या गृहखात्याला पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अजित पवार वारंवार प्रसारमाध्यमांविषयी वक्तव्ये करीत असल्यानं पत्रकारांनी त्यांची तोंड बंद करायची का ? असा संतप्त सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला. तर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही औरंगाबाद इथं अजित पवारांच्या विधानाचा निषेध नोंदविला.

close