भाजप-शिवसेना -मनसे युती ‘पॉसिबल’ – मुंडे

February 6, 2011 3:50 PM0 commentsViews: 7

06 फेब्रुवारी

भाजप- शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विचारला जातोय. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबादमध्ये आज या नव्या युतीचे संकेतच दिले आहे. गोपीनाथ मुंडे म्हणाले की, मनसे ही शिवसेना भाजपच्या विरूध्द लढली त्यांच्या तेरा जागा निवडून आल्या आणि 53 जागेवर त्यांची आणि आपली मत जर मिळवली तर काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा आपण आघाडीवर राहू म्हणजे 13 आणि 53 जागा मिळवल्या तर 66 जागा होतात यात जर आपल्याला आलेल्या 110 जागा मिळवल्या असत्या तर तेव्हाचं सरकार आलं असतं. यानंतर लोक आम्हाला म्हणाले ही होते मनसे आणि तुम्ही एकत्र यावं पण हे फार अवघड आहे पण राजकारण 'नथिंग इज इम्पॉसिबल' आणि 'इम्पॉसिबलला पॉसिबल' करण्यास आम्ही आहोत ना त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र येऊन एकजूट होण गरजेचं आहे. समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे सेना-मनसे आणि भाजपच्या युतीचे संकेत मुडेंनी दिले आहेत. राजकारणात काहीही अशक्य नाही असंही मुंडे यांनी वक्तव्य केलं. त्यामुळे भविष्यात शिवसेना-मनसे आणि भाजप एकत्र येणार या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. तसेच सचिन तेंडुलकर कॅप्टन नसला तरी टीममध्ये त्याचं महत्त्व तितकंच आहे, या शब्दात भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात परतण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला. एवढंच नाहीतर सिंहासन का नको असा मिश्किल सवाल विचारत आपली मुख्यमंत्रीपदाची इच्छाही पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली.

close