कसाबच्या फाशीसंबंधी निर्णय 21 फेब्रुवारीला

February 7, 2011 9:21 AM0 commentsViews: 2

07 फेब्रुवारीमुंबईत झालेल्या 26-11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला झालेल्या फाशीच्या शिक्षेचा निकाल येत्या 21 फेब्रुवारीला देण्यात येणार आहे. या खटल्यातील कसाबची फाशी कायम करणे, कसाबचं शिक्षेविरोधात अपील, फईम अन्सारी आणि सबाऊद्दीन यांना निर्दोष सोडल्याबदद्ल सरकारचं अपील या तीन मुद्द्यांवर निकाल येणार आहे.मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई आणि न्यायमूर्ती रणजीत मोरे यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील दहशतवादी हल्याचा खटला मुंबई हायकोर्टात सुरु होता. हा खटला काही दिवसांपूर्वी संपला. खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. आज या प्रकरणात निकाल येणं अपेक्षित होतं पण कोर्टानं हा निकाल येत्या 21 फेब्रुवारीला देण्यात येणार आहे असं स्पष्ट केलं.

close