सानंदाप्रकरणी विलासराव मंत्रीपदी राहतातच कसे- गांगुली

February 7, 2011 9:37 AM0 commentsViews: 3

07 फेब्रुवारी

सावकार सानंदा प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढल्यावरही विलासराव मंत्रीपदावर राहतातच कसे ? असा सवाल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ए. के. गांगुली यांनी केला. कोर्टानं एवढे कडक ताशेरे ओढून आणि दंड केल्यानंतरही त्यांना कॅबिनेटमंत्रीपद देणं हे अतिशय धक्कादायक आणि लज्जास्पद आहे, असं मतही त्यांनी शनिवारी मुंबईत बोलताना व्यक्त केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. बुलढाण्याचे आमदार दिलीप सानंदा यांच्या कुटुंबियांना सावकारी प्रकरणात पाठीशी घातल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं 14 डिसेंबरला विलासरावांवर कडक ताशेरे ओढले होते आणि 10 लाखांचा दंडही केला होता. ज्या खंडपीठानं हा निकाल दिला त्या खंडपीठाचे न्या.गांगुली हे एक सदस्य होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयातून पोलिस स्टेशनमध्ये फोन करून आमदार सानंदाच्या कुटुंबियांविरूध्द कारवायी न करण्याविषयी सांगितलं गेलं होतं.

close