नीरा राडियानी टाटाचे पैसे शिवालिकला मिळवून दिले – पाटकर

February 7, 2011 9:55 AM0 commentsViews: 3

07 फेब्रुवारी

सांताक्रुझ गोळीबार भागात सुरु असलेल्या शिवालिक व्हेंचर्सच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या गाजत आहे. याचप्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आता एक धक्कादायक आरोप केला आहे. वादग्रस्त नीरा राडियानं मुंबईत टाटा रियालिटीकडून 650 कोटी रुपये युनि-टेकला मिळवून दिल्याचा आरोप पाटकर यांनी केला. नंतर युनिटेकनं हेच पैसे शिवालिक व्हेंचर्स प्रा. लिमिटेडच्या पुर्नविकासाच्या प्रकल्पात गुंतवले आहेत. आता युनिटेक कंपनीचे शेअर्सही शिवालिक व्हेंचर्समध्ये आहेत. असा धक्कादायक आरोप मेधा पाटकर यांनी केला.

close