ईडन गार्डनची दुसर्‍यांदा पाहणी

February 7, 2011 10:20 AM0 commentsViews: 32

07 फेब्रुवारी

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर वर्ल्ड कपच्या उरलेल्या तीन मॅच तरी ठरल्याप्रमाणे पार पडतील अशी शक्यता आहे. आयसीसीच्या पिच समितीने स्टेडिअमची आज दुसर्‍यांदा पाहणी केली. आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तयारीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. साईट स्क्रीनची उंची आणि प्रेक्षकांच्या गॅलरीतल्या सोयी याबद्दल यापूर्वी आयसीसीने आक्षेप घेतला होता. पण आता आयसीसीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात सुधारणा झाली आहे. स्टेडिअममध्ये इलेक्ट्रॉनिक स्कोअर बोर्ड अजून बसवायचा आहे. त्यापूर्वी कोलकात्यातल्या काही लोकांनी आज सोमवारी भारत विरुद्ध इंग्लंड मॅच या कोलकात्यातून हटवण्याच्या आयसीसीच्या निर्णयाविरुद्ध निदर्शनं केली. ईडन गार्डन्स मैदानाबाहेर काही संतप्त लोकांनी मोर्चा काढला होता.

close