नागपूरमध्ये विहिरीत पडलेल्या वाघाची सुटका

February 7, 2011 1:52 PM0 commentsViews: 1

07 फेब्रुवारी

नागपूरजवळच्या कोंढाळीजवळ कोरड्या विहिरीत पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यात आलं आहे. तब्बल 5 तासाच्या प्रयत्नानंतर वन अधिकारी या वाघाला सुर क्षित बाहेर काढू शकले. या वाघाला वन्यजीव तज्ञांनी ट्रॅकूलाईज गनच्या माध्यमातून बेशुध्द केलं. त्यानंतर या वाघोबाना विहिरीच्या बाहेर काढलं. या वाघाला आता नागपूरच्या वन विभागाच्या रेस्कू सेंटरमध्ये उपचारासाठी घेवून जाण्यात येणार आहे. गेल्या अनेक तासापासून वाघ विहिरीत असल्यामुळे त्याला अशक्तपणा येण्याची शक्यता आहे. वाघाचं वय कमी असल्यामुळे त्याला जंगलात सोडायचं किंवा काही काळ पिंजर्‍यात ठेवायचं याचा निर्णय वन अधिकारी घेणार आहे. विहिरीच्या काठावर पिंजरा ठेवण्यात आला आहे. वाघाला मदत व्हावी म्हणून विहिरीत एक शिडीही टाकण्यात आली होती. वन विभागाचे 12 अधिकारी वाघाला बाहेर काढण्यासाठी कार्यरत होते. सोबत 4 डॉक्टरांचं पथकही होतं.

close