आश्रमशाळेतल्या मुलीवर बलात्कार

February 7, 2011 12:10 PM0 commentsViews: 2

07 फेब्रुवारी

नाशिकमध्ये आदिवासी आश्रमशाळेतल्या 8 वीतील विद्यार्थीनीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार करण्याची घटना उजेडात आली. दिंडोरी तालुक्यातील नारेगाव आश्रमशाळेतील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीला आश्रमशाळेतून पळवून नेण्यात आल होतं. या वेळी आश्रमशाळेतील एकही कर्मचारी उपस्थित होत नसल्याची तक्रार पिडित मुलीच्या पालकांनी केली. तर शाळा मुख्याध्यापक आणि अधिक्षक उपस्थित असल्याचा दावा प्रकल्प अधिकार्‍यांनी केला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये एका आश्रमशाळेत मुलीनं गळफास घेवून आत्महत्या केली होती.

close