बाळाच्या लसीकरणाची पूर्वसूचना देणारी वेबसाईट !

February 7, 2011 11:28 AM0 commentsViews: 62

07 फेब्रुवारी

कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाची पूर्वसूचना देणारी प्रणाली आता लोकांसाठी उपलब्ध झाली आहे. अमोल जावळे या संगणक तज्ञाने तयार केलेल्या या प्रणालीचा शुभारंभ जळगावला झाला. संपूर्ण विनामूल्य असलेला हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. जन्माला आलेल्या बाळाची योग्य वाढ होण्यासाठी त्याला वयाच्या 12 वर्षापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लस देणं आवश्यक आहे. अगदी पोलीओच्या डोस पासून ते मेंदूज्वर लस पर्यंत आणि या लसीकरणाच्या वेळापत्रकाची ही संगणक प्रणाली आपल्याला आठवण करुन देते immuniseontime.com या संकेतस्थळावर आपल्या बाळाची नोंदणी केल्यानंतर आपल्याला तक्ता तर मिळतोच पण लसीकरणाची आठवण करुन देणारे नियमित एसएमएस ही येतात आणि याकरीता कोणतीही आकारणी नाही हे विशेष. मूळ जळगांव जिल्ह्यातील असलेल्या अमोल जावळे या संगणक तंत्रज्ञानं सामाजिक बांधिलकी म्हणून ही सेवा पूर्ण देशात विनामूल्य खुली केली आहे.

close