टेम्पो आणि ओमनीचा अपघातात सहा ठार

February 7, 2011 11:40 AM0 commentsViews: 8

07 फेब्रुवारी

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टेम्पो आणि ओमनीचा अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहे. मृत्यू झालेले सर्व सहाही जण मुंबईतल्या गोरेगावचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. हा अपघात पुण्यातल्या किवळे ब्रीजजवळ झाला आहे. निगडीतल्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. धडक दिलेल्या टेम्पोचा चालक आणि क्लीनर दोघेही फरार आहेत. पोलिसांचा तपास सुरु आहे.

close