दुखापतग्रस्त प्रवीण कुमार टीममधून आऊट;श्रीसंतला संधी ?

February 7, 2011 11:53 AM0 commentsViews: 1

07 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धेला काही दिवस शिल्लक असतानाचं भारतीय टीमला एक मोठा धक्का बसला आहे. फास्ट बॉलर प्रवीण कुमार कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याच्या ऐवजी एस श्रीसंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या वन डे सीरिजमध्येच प्रवीणला ही दुखापत झाली होती. पण तो वेळेवर फिट होईल या आशेने वर्ल्ड कप टीममध्ये त्याची निवड झाली. पण गेल्याच आठवड्यात त्याचं दुखणं बळावलं. आणि वैद्यकीय चाचणीसाठी तो इंग्लंडला गेला होता. पण आता ही दुखापत वर्ल्डकप पूर्वी बरी होण्याची शक्यता नाही त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये प्रवीणकुमार खेळणार नाही.

close