पहिला स्वरभास्कर पुरस्कार लता मंगेशकर यांना जाहीर

February 7, 2011 12:40 PM0 commentsViews: 4

07 फेब्रुवारी

पुणे महानगरपालिकेच्या वतीने दिल्या जाणार्‍या पहिल्या पंडित भीमसेन जोशी पुरस्काराची घोषणा झाली. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना हा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 लाख 11 हजार 161 रुपये रोख, चांदीचं मानपत्र, चांदीचं स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. 12 फेब्रुवारीला सितारादेवी यांच्याहस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. पुण्यातल्या सहकारनगर भागात असलेल्या पंडित भीमसेन जोशी कलादालनात हा सोहळा रंगणार आहे. तर प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी विविध कलाकारांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे.

close