ब्रायन ऍडम्सच्या कॉन्सर्टसाठी जोरदार तयारी सुरु

February 7, 2011 12:32 PM0 commentsViews: 6

07 फेब्रुवारी

ब्रायन ऍडम्सची म्युझिकल कॉन्सर्ट लवकरच भारतातल्या निवडक शहरांमध्ये होणार आहे. या कॉन्सर्टचा पहिला शो 11 फेब्रुवारीला पुण्यात होणार आहे. पुण्याच्या अमिनुरा पार्कवर हा शो होणार आहे. यासाठी अगदी जोरदार तयारी सुरु आहे. या शोसाठी दोन हजार रूपयांपासून ते साडेतिन हजारापर्यंत तिकीटांची सुरूवात आहे. या शोसाठी खास पारदर्शक एलएडी बसवण्यात येणार आहे तर 40 फूटाच्या साऊंड वॉल असणार आहे अशी माहिती या शोचे आयोजक अनिरूध्द देशपांडे यांनी दिली आहे. भारतातल्या सर्वात जास्त गर्दी खेचणार शो होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.

close