अहमदनगरमध्ये कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

February 7, 2011 3:03 PM0 commentsViews: 25

07 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी जवळील रामपूर वाडीत 32 वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. संदीप धनवटे असं या तरुणाच नाव आहे. या तरुणाने कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी संदीपनं अहमदनगरच्या एसपींच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली. राहत्याच्या कुदळेकडून 40 लाख रुपये 30 टक्के व्याजदराने आपण घेतल्याचं त्यानं या चिठ्ठीत लिहिलयं. तसेच आपल्यानंतर कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी संदीपने चिठ्ठीत केलीय. संदीपने कशासाठी कर्ज घेतलं होतं याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पूणतांब्याच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आला. पण पोस्टमॉर्टमनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ज्या सावकारांनी संदीपला त्रास दिला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली. पोलिसांनी तीनजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सुरेश कुदळे, अशोक कुदळे, सोमनाथ वेलंगर असं या तिघांची नावं आहेत. या तिघांविरुध्द आत्महत्येला प्रवृत्त करण्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या या तीनही आरोपींच्या शोधात पोलीस आहेत.

close