मीडियामुळेच भारताच्या विकासाला मोठा हातभार लागला – राष्ट्रपती

February 7, 2011 3:26 PM0 commentsViews: 2

07 फेब्रुवारी

नांदेड येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार मीडियावर बंदी आणा असं म्हणत पत्रकारांवर टीका केली होती. पण नागपूरला काल रविवारी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी एका समारंभात मीडियाची स्तुती केली आहे. मीडियामुळेच भारताच्या विकासाला मोठा हातभार लागला आहे तसेच मीडियामुळे अनेक क्षेत्रांचा विकास झाला आहे महाराष्ट्र राज्यातील महात्मा गांधी तंटा मुक्ती योजना अशा अनेक योजनाना प्रसारमाध्यमानी लोकापर्यंत पोहचवण्याचं कार्य ही केलं आहे. मीडियाच्या या कामामुळे प्रोत्साहित करण्यास मला योग्य वाटतं. लोक नेहमी खळबळजनक बातम्या लागत नाही तर त्यांना मार्गदर्शन ही लागतं असतं मीडियाकडून हे काम होतं असतं तसेच या दृष्टीकोनातून आपला विकास करावा अशा शब्दात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी मत व्यक्त केलं.