कोल्हापूरमध्ये ढोलांचा आवाज ‘अटकेपार’ घुमणार

February 7, 2011 11:30 AM0 commentsViews: 14

07 फेब्रुवारी

21 फेब्रुवारीला अवघं कोल्हापूर ढोलांच्या गजरानं दुमदुमून जाणार आहे. निमित्त आहे 'अभंगनाद' हा कार्यक्रमाचं. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेनं आयोजित केलेल्या अभंगनाद या कार्यक्रमात एक हजार पेक्षा जास्त ढोलक वादक ढोल वाजवून गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करणार आहेत. तसा चंगच या सर्वांनी बांधला आहे. या कार्यक्रमासाठी आज कोल्हापुरात सराव करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 2 हजार वारकरी सहभागी होणार आहेत. यामधून लोककलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं आहे.

close