आसाम बॉम्बस्फोटातील संशयितांची रेखाचित्रं जारी

November 4, 2008 4:18 PM0 commentsViews: 5

4 नोव्हेंबर आसाम,आसाममध्ये झालेल्या,साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी,संशयितांची रेखाचित्रं जारी करण्यात आली आहेत. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीवरून, ही रेखाचित्रं तयार करण्यात आली आहेत. गुवाहाटी आणि आसाममधल्या तीन जिल्ह्यात,गेल्या आठवड्यात साखळी बॉम्बस्फोट झाले होते.त्यात 77 जणांचा मृत्यू झाला होता तर तीनशेहून जास्त,लोक जखमी झाले होते. या बॉम्स्फोटांमागे हुजी ही दहशतवादी संघटना असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

close