बलात्काराला विरोध केल्यामुळे दलित मुलीवर हल्ला

February 7, 2011 4:30 PM0 commentsViews: 1

07 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशात आणखी एका दलित मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेत आरोपींनी पीडित मुलीवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. शनिवारी फत्तेपुरात हा प्रकार घडला या घटनेत गंभीर जखमी मुलीवर सध्या कानपूरमध्ये उपचार सुरु आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज या पीडित मुलीची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आज आणखी एका आरोपीला अटक केली. तर दोन जण अजूनही फरार आहेत.

close