महिलांवर होणार्‍या अत्याचारांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ

February 7, 2011 4:36 PM0 commentsViews: 8

07 फेब्रुवारी

महिलांवर होणार्‍या अत्याचारांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनसीआरबी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.एनएसआरबीने 2009 या वर्षी महिलांवरील अत्याचाराची माहिती समोर आणली आहे. त्यानुसार 2009 मध्ये भारतात 2 लाख 3 हजार 804 महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. 2008च्या तुलनेत हा आकडा 4.1 टक्क्यांनी वाढला आहे. तर मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, छळ, लैंगिक अत्याचार, बलात्कार, मारहाण, हंुडाबळी, अपहरणसंबंधित हे अत्याचार आहेत. यात सर्वाधिक घटना आहेत त्या पती किंवा नातेवाईकांकडून होणार्‍या छळाच्या. तसेच भारतात सर्वाधिक अत्याचार नोंदवले गेले आहेत आंध्रप्रदेशमध्ये. आंध्रमध्ये 25 हजार 569 घटनांची नोंद झाली. त्याखालोखाल पश्चिम बंगाल – 23 हजार 307, उत्तरप्रदेश – 23 हजार 254, राजस्थान – 17 हजार 316, महाराष्ट्र – 15 हजार 48 घटना, मध्यप्रदेश – 15 हजार 827 दिल्लीत – 4 हजार 251 घटनांची नोंद झाली. देशातल्या इतर राज्यांमध्येही हे प्रमाण वाढतंय असं दिसून आलं आहे. पती किंवा नातेवाईकांकडून होणार्‍या छळाचं प्रमाण 43.9 इतकं आहे.

close