2 जी स्पेक्ट्रमवरून मीरा कुमार यांची अपक्ष खासदारांची भेट

February 7, 2011 1:47 PM0 commentsViews: 2

07 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रमच्या मुद्द्यावरून झालेली संसदेची कोंडी फोडण्यासाठी लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज अपक्ष खासदारांची भेट घेतली. हिवाळी अधिवेशनाप्रमाणे संसदेच्या येत्या बजेट अधिवेशनही गदारोळात कामकाज ठप्प होऊ नये असे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच 2 जी स्पेक्ट्रच्या संयुक्त संसदीय चौकशीची विरोधकांची मागणी मतदानासाठी ठेवण्याचा सरकार विचार करतं आहे. भाजप आणि डाव्या पक्षांच्या मतभेदामुळे विरोधकांचा पराभव होईल असंही सरकारनं गृहित धरलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ट्रबलशूटर प्रणव मुखर्जी यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

close