पुण्यात अभिनव कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बहिष्कार आंदोलन

February 7, 2011 5:41 PM0 commentsViews: 2

07 फेब्रुवारी

पुण्यात अभिनव महाविद्यालयातील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी संस्थेच्या सचिवांच्या विरोधात बहिष्कार आंदोलन सुरू केलं आहे. संस्थेच्या पाषाण येथील कॉलेजमधील विद्यार्थी चेतन कडू याला मागच्या वर्षी आंदोलन केलं याचा राग धरून रस्टीकेट केल्याचा दावा आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी केला याशिवाय संस्थेचे सचिव भालचंद्र पाठक मनमानी पध्दतीनं कारवाई करत असल्याचा आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा फटका टिळक रोडवरील कॉलेजलाही बसला असून पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे. दरम्यान या आंदोलनाचा ठपका कॉलेज मधील शिक्षक बगाडे यांच्यावर ठेवुन त्यांना संस्थेचे सचिव पाठक यांनी या शिक्षकांना झापलं. त्यामुळे घामाघुम होऊन हे शिक्षक चक्कर येउन पडले. दरम्यान, अभिनव संस्थेचे सचिव पाठक यांनी विद्यार्थी चुकीच्या माहितीवर कोणाच्या चिथावणीवरून आंदोलन करत असल्याचं स्पष्ट करत आरोप फेटाळले.

close