सानंदा प्रकरणी सरकारने 10 लाखांचा दंड भरला

February 8, 2011 9:30 AM0 commentsViews: 15

08 फेब्रुवारी

आमदार दिलीप सानंदा सावकारी प्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळे झालेल्या 10 लाख रुपयांचा दंड गृहमंत्रालयानं राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे भरला आहे. मुदत संपण्याच्या आत हा दंड भरण्यात आला आहे. गृहमंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती आयबीएन लोकमतला दिली. सानंदा सावकारी प्रकरणातून आमदार दिलीप सानंदा यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर सुप्रीम कोर्टानं ताशेर ओढले होते तसेच या प्रकरणी राज्यसरकारला सहा आठवड्यांच्या आत दहा लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले होते. सानंदा प्रकरणी दंडाची रक्कम भरल्यामुळे विलासराव -सानंदा प्रकरण सुप्रीम कोर्टात बंद करण्यात आलं आहे. तर विलासराव देशमुखांनीच दंडाची रक्कम भरायला हवी होती असं मत मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं. विधानसभेत हा मुद्दा लावून धरु असं नांदगावकर म्हणाले.

close