सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी आरोपींना 21 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

February 8, 2011 10:47 AM0 commentsViews: 1

08 फेब्रुवारीप्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्यात आलं होतं. या प्रकरणी दोन दिवसातच 11 आरोपीना अटक करण्यात आली होती. या पैकी मुख्य आरोपी पोपट शिंदे हा 70 टक्के भाजल्यामुळे त्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी मनमाड कोर्टाने सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी सर्व 9 आरोपींना 21 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्व 9 आरोपींची रवानगी नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात येणार आहे. यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडप्रकरणानंतर राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली. आणि सर्वत्र धाडसत्र सुद्धा सुरु झालं. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी गृहमंत्र्यालयाकडून विनंती ही करण्यात आली आहे.

close