प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी

February 8, 2011 10:55 AM0 commentsViews: 2

08 फेब्रुवारीप्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मुतीर्ंवर बंदी घालण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीनं या संदर्भात 2005 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यात गणेशोत्सवाच्या काळात अंदाजे 1 कोटी घरांमध्ये गणपती बसतात. प्रत्येक मुर्तीमागे दोन किलो या प्रमाणे एकुण 2 कोटी किलो प्लॅस्टर ऑॅफ पॅरिस तसेच रंग हा पाण्यात सोडला जातो. त्यामुळे प्रदुषण रोखण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीवर बंदी घालण्याची मागणी अंनिसन केली होती. या संपुर्ण प्रकरणादरम्यान केंद्रीय पर्यावरण नियामक मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाने या संदर्भीत आपापले म्हणणे मांडले. या संदर्भात हायकोर्टाने गणेशाच्या मुर्ती या माती पासून तयार केलेल्या असाव्यात असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच वनस्पती किंवा पाण्यात विरघळणार्‍या रंगाचाच वापर या मुर्तीरंगवण्यासाठी करावा असही हायकोर्टाने सांगितल आहे. आपल्या आदेशाचे पालन करण्यासाठी जर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याच ते ही दाखल करावे असही हायकोर्टानं सांगितलं आहे.

close