विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

February 8, 2011 11:00 AM0 commentsViews: 6

08 फेब्रुवारी

रत्नागिरीमधल्या नाणार गावात आज एक बिबट्या विहिरीत पडला होता. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळवलं होतं. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी प्रयत्न करुन बिबट्याची सुटका केली. बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू होऊ नये म्हणून गावकर्‍यांनी लाकडी फ़ळी विहिरीत टाकून बिबट्याला सुरक्षित केलं होतं. या बिबट्याचं वय साडेतीन वर्षं आहे. लांजा, राजापूर भागात मोठ्या प्रमाणात बिबटे वस्तीत घुसण्याच्या घटना वाढत आहे. सुटका झालेल्या या बिबट्याला जंगलात सोडण्यात आलं.

close