मायावतींचे बूट सुरक्षा अधिकार्‍यानी पुसले

February 8, 2011 11:16 AM0 commentsViews: 2

08 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशातील सर्वेसर्वा मायावती यांची दहशत तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचा रूबाब असा आहे की त्यांचे बुट पुसायला त्यांचे सुरक्षा अधिकारीही तयार होतात. असाच प्रकार सोमवारी घडला. मायावती औरिया जिल्ह्याच्या दौर्‍यावर होत्या. त्या त्यांच्या चॉपरमधून बाहेर पडल्या आणि त्यांच्या सुरक्षा अधिकार्‍यानं स्वत:च्या खिशातून स्वत: चा रूमाल काढला आणि त्यानं बहनजींचे बूट नीट पुसले. बहनजी इतरांशी बोलण्यात मग्न होत्या आणि हा अधिकारी त्यांचे बूट पुसण्यात व्यस्त होता.

close