चतुर्थश्रेणी कामगाराच्या मागणीसाठी कोतवालांचं धरणं आंदोलन

February 8, 2011 11:28 AM0 commentsViews: 7

08 फेब्रुवारी

आपल्याला चतुर्थश्रेणी कामगार करावं कोतवालांच्या या मागणीसाठी आज राज्यभरातल्या कोतवालांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कोतवालांना चतुर्थश्रेणी कामगार म्हणून मान्यता देण्याचं जाहीर केलं होतं. पण त्यावर अजून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आलं. चतुर्थश्रेणी कामगार केल्यानंतर तिजोरीवर 138 कोटींचा बोजा पडणार आहे. पण त्याचवेळेला राज्यभरातल्या जवळपास 13 हजार कोतवालांना दिलासा मिळून त्यांचे संसार मार्गी लागणार आहेत. म्हणूनच सरकारने आपलं आश्वासन लवकरात लवकर पाळावं अशी या कोतवालांनी मागणी केली.

close