स्त्री भ्रृणहत्येला प्रशासनच जबाबदार रेडिओलॉजिस्ट संघटनेचा आरोप

February 8, 2011 11:45 AM0 commentsViews: 1

08 फेब्रुवारी

स्त्री भ्रृणहत्येला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप रेडिओलॉजिस्ट संघटनेनं केला. उत्तर महाराष्ट्रातल्या रेडिऑलॉजिस्टची परिषद नुकतीच धुळ्यात पार पडली. रेडिओलॉजीमधल्या अद्ययावत तंत्रज्ञानाची आणि कायद्यांची माहिती संघटनेच्या सदस्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्त्री भ्रृणहत्या कुठे चालतात हे सरकारला माहित आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रशासनाची हिंमत आणि इच्छाशक्ती नसल्याचा आरोप रेडिओलॉडीस्टनं केला आहे.

close