पुण्यातील बॉम्बस्फोटातल्या बळींच्या कुटुंबियांपर्यंत सरकारी मदत कागदावरच !

February 8, 2011 11:42 AM0 commentsViews: 7

08 फेब्रुवारी

पुण्यातल्या जर्मनबेकरी बॉम्बस्फोटाला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होतं. या स्फोटात जखमी झालेल्या जखमी अनेकांच्या जखमा अजुनही ओल्याच आहेत तर दुसरीकडे या स्फोटाचा पहिला बळी ठरलेल्या गोकुळ नेपाळीच्या कुटुंबियांपर्यंत अजूनही राज्य सरकारची मदत पोहोचलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. 13 फेब्रुवारी 2010 रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात 17 बळी गेले होते. त्यात जर्मन बेकरीतील बॉम्ब ठेवलेली बॅग उचलण्याचा प्रयत्न करणारा गोकुळ नेपाळी पहिला बळी ठरला. स्फोटातल्या बळींच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्य सरकारनं जाहीर केलेल्या 8 लाख रूपयांच्या मदतीपैकी केवळ 2 लाख रूपये आतापर्यंत गोकुळच्या नातेवाईकांना मिळाले आहेत. त्यासाठी सुद्धा त्यांना अनेकदा चकरा माराव्या लागल्या आहेत. मिळालेले दोन लाख सुद्धा केंद्र सरकारच्या निधीतले आहेत. तर मग राज्य शासनाची मदत गेली कुठे असा प्रश्न आहे. मात्र या दिरंगाईला नेपाळचा दूतावास जबाबदार असल्याचा जिल्हाधिकार्‍यांचा आरोप आहे.

close