प्रवीण कुमारच्या ऐवजी श्रीशांतची निवड

February 8, 2011 12:13 PM0 commentsViews: 5

08 फेब्रुवारी

भारतीय वर्ल्ड कपमध्ये जखमी प्रवीण कुमारच्या ऐवजी एस श्रीशांतची निवड झाली आहे. कोपराच्या दुखापतीमुळे प्रवीण कुमार वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे एस श्रीशांतला ही संधी मिळाली आहे. श्रीशांतचा हा पहिला वर्ल्ड कप असेल. वन डेमध्ये श्रीशांतचा इकॉनॉमी रेट सहा रनच्या पुढे आहे. पण त्याला लय सापडली तर तो धोकादायक बॉलर ठरु शकतो. दक्षिण आफ्रिकेतल्या वन डे सीरिजमध्ये तो भारतीय टीममध्ये होता. पण फारसा प्रभावी ठरला नव्हता. मात्र त्याचा अनुभव आणि आक्रमक बॉलिंग त्याच्या मदतीला धावून आली. विनय कुमार आणि ईशांत शर्माला मागे सारुन टीममध्ये त्याची वर्णी लागली आहे.

close