अखिलेश प्रसाद सिंग यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप

November 4, 2008 5:28 PM0 commentsViews: 2

04 नोव्हेंबर पाटणा,मंत्र्यानं आपल्या शक्तीचं प्रदर्शनं केल्याची घटना,पुन्हा एकदा घडली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते,अखिलेश प्रसाद सिंग यांनी किंग फिशर एअर लाईन्सच्या एअरपोर्ट मॅनेजरला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. किंग फिशर एअरलाईन्सचे एअरपोर्ट मॅनेजर यांनी अशी तक्रार पाटणा इथल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते अखिलेश प्रसाद सिंग यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप सागर यांनी केला आहे. सागर यांची चूक फक्त एवढीच होती, की त्यांनी मंत्री महोदयांना उशीर झाल्यामुळं पाटणा-कोलकत्ता विमानात बसू दिलं नाही.

close