‘क्या फॅमिली है’ या हिंदी नाटकात गौरी कर्णिक मुख्य भूमिकेत

February 8, 2011 12:27 PM0 commentsViews: 13

माधुरी निकुंभ, मुंबई

08 फेब्रुवारी

'क्या फॅमिली है..' हे नवं हिंदी नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. नाटकात छोट्या पडद्यावर दिसणारे अनेक कलाकार काम करताना आपल्याला दिसणार आहे. लकी अलीच्या सूर सिनेमात गौरी कर्णिक नावाची मराठमोळी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली होती. आता तीच गौरी ' क्या फॅमिली है ' ह्या विनोदी नाटकातून हिंदी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. ती या नाटकात दुहेरी भूमिका साकारणार आहे. फौजेत कार्यरत असलेल्या कर्नलचं कुटुंब या नाटकात दाखवण्यात आलं आहे. त्या कुटुंबातल्या लोकांच्या अवती भवती या नाटकाचं कथानक गुंफण्यात आलं आहे.मुंबईत असलेला जागेचा प्रश्न आणि नव्या पिढीच्या प्रॉपर्टी साठीचा आटापिटा हे मुद्दे नाटकात ठळक पणे मांडण्यात आले. नाटकाचा विषय जरी गंभीर असला तरी तो दिग्दर्शकाने विनोदी पध्दतीने सगळ्यांसमोर मांडला आहे. या नाटकाचं दिग्दर्शक प्रमोद सिंग यांनी केलं आहे. बघताना हसता हसता थोडा विचार करायला लावणारं आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणार्‍या या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

close