माळरानावरच्या आश्रमशाळेवर गुंडांची दहशत

February 8, 2011 1:01 PM0 commentsViews:

08 फेब्रुवारी

नाशिकमध्ये सोमवारी आश्रम शाळेतल्या 8 वीत शिकणार्‍या आदिवासी विद्यार्थीनीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातल्या नाळेगावमध्ये घडला. 190 मुलींची वस्ती असलेल्या या आश्रमशाळेत कायमस्वरूपी रेक्टरचं पदही रिक्त आहे. माळरानावर उभ्या या आश्रमशाळेला साधं तारेचं कुंपणही नाही. त्यामुळेच गावातल्या गुंडांना शाळेत घुसून मुलीला पळवून नेणं आणि तिच्यावर अत्याचर करणं सोपं झालं आहे. आमची रिपोर्टर दीप्ती राऊत यांनी या ठिकाणी भेट दिली असता या भयंकर परिस्थितीची माहिती उघड झाली.

close