राज ठाकरे यांना 3 प्रकरणात जामीन मंजूर

February 8, 2011 6:17 PM0 commentsViews: 2

08 फेब्रुवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात तीन वेगवेगळ्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला. 21 ऑक्टोबर 2008 रोजी परप्रांतियांविरूध्द चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी उमटलेल्या पडसादातील, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये त्यांच्यावर राज्यभरात तब्बल 82 गुन्हे दाखल आहेत. औरंगाबादच्या 5 आणि जालन्यातील 5 प्रकरणामंध्ये जामीन घेण्यासाठी राज ठाकरे 3 दिवस औरंगाबादेत मुक्कामी आहेत. त्यापैकी 3 प्रकरणात त्यांना आज जामीन मिळाला. बुधवारी जालन्यात 5 प्रकरणांवर सुनावणी होणार आहेत. तर गुरूवारी औरंगाबाद येथेच पुन्हा 2 प्रकरणात राज ठाकरेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल.

close